Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, रविवार १ जानेवारी २०२३; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 594

 

मेष:-

Manganga

जोडीदाराला खुश कराल. तुमचा व्यवहार शालीन राहील. आज तुमचा चांगला प्रभाव पडेल. गोष्टी मनाप्रमाणे घडवून आणाल. न आवडणार्‍या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे.

 

 

वृषभ:-

आज उधारी घेणे टाळावे.  अचानक खर्च समोर येऊ शकतात. आध्यात्मिक बाबतीत प्रगती कराल. मानसिक व्यग्रता टाळावी. आपल्या मतावर ठाम राहावे.

 

 

मिथुन:-

भावंडांसोबतच्या नात्यात सुधारणा होईल.  आज चांगला धनलाभ होईल. जवळचे मित्र भेटतील. गोष्टी मनाप्रमाणे घडून येतील. केलेल्या गुंतवणुकीतून चांगला लाभ होईल.

 

 

कर्क:-

घरातीलकामासाठी वेळ काढावा लागेल.  कामाच्या ठिकाणी प्रगती कराल. मन प्रसन्न राहील. कामाचा उरक वाढवावा. सहकार्‍याला मदत कराल.

 

 

सिंह:-

धार्मिक ग्रंथांचे वाचन कराल. बिघडलेल्या गोष्टी संतुलित करता येतील. इतरांच्या आनंदाने खुश व्हाल.  आज मनात करुणा निर्माण होईल. कामाच्या निमित्ताने प्रवास करावा लागेल.

 

 

कन्या:-

व्यायामाला कंटाळू नका. आरोग्याबाबत बेफिकीर राहू नका. काही अनपेक्षित गोष्टी घडून येतील. बाहेरील अन्नपदार्थ खाऊ नका. हलका आहार घ्यावा.

 

 

तूळ:-

सर्वांशी आपुलकीने वागाल. जोडीदारासमवेत वेळ माझे घालवाल. कौटुंबिक जीवनात समाधान मिळेल. लहान व्यवसायिकांना चांगला नफा कमावता येईल. तुमच्या ओळखीत वाढ होईल.

 

 

वृश्चिक:-

छुपे शत्रू माघार घेतील. कोणाकडूनही फार अपेक्षा ठेऊ नका. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. आपल्या कामात स्वत:ला गुंतवून घ्याल. हाताखालील लोकांवर विसंबून राहू नका.

 

 

धनू:-

रेस, सट्टा यातून लाभ संभवतो. कौटुंबिक जीवनात सुखद अनुभव येतील. उत्तम वाहन सौख्य लाभेल. आजचा दिवस खेळीमेळीने घालवाल. मुलांसोबत वेळ मजेत जाईल.

 

 

मकर:-

वाहन विषयक कामे पार पडतील. आज अधिक वेळ घरात काढाल. मनातील विचार घरातील लोकांसमोर मांडाल. स्वत:ला कामात गुंतवून घ्याल. मनातील निराशा दूर सारावी.

 

 

कुंभ:-

लहान भावंडे आपल्याला मदत करतील. आज घाई गडबडीने कोणताही निर्णय घेऊ नका. चौकसपणे सर्व गोष्टींकडे पहावे. प्रवासात काळजी घ्यावी. वाहन वेगावर नियंत्रण ठेवावे.

 

 

मीन:-

खाण्यापिण्याची हौस भागवाल. कुटुंबातील व्यक्तींबाबत अतिशय दक्ष राहाल. मनातील भावना व्यक्त कराल. सर्वांची आपुलकीने काळजी घ्याल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!