नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधी पक्षाकडून पंतप्रधान पदाचे उमेदवार कोण, यावरून चर्चा सुरू आहे. काल यासंदर्भात मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी वक्तव्य केलं होतं. आज बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी प्रतिक्रिया दिली.
यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार म्हणाले, विरोधी पक्षाच्या वतीनं राहुल गांधी यांच्या नावावर आम्हाला आपत्ती नाही. विरोधी पक्षांचे नेते एकमेकांशी चर्चा करतील. पक्षाचे कार्यक्रम करणे प्रत्येकाचे काम आहे. पंतप्रधान पदाचा मी दावेदार नाही. पक्षाच्या कामासोबत आम्हाला काही घेणं-देणं नाही. सर्व पक्ष फ्री झाल्यानंतर बैठक बोलावण्यात येईल. त्यानंतर निर्णय घेण्यात येईल.

दरम्यान, काल काँग्रेस नेते कमलनाथ म्हणाले होते की, विरोधी पक्षांकडून संयुक्तपणे राहुल गांधी यांचे नाव २०२४ च्या पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी घेतले जात आहे. राहुल गांधी हे सत्तेसाठी नव्हे तर देशासाठी राजकारण करत असल्याचंही सांगितलं.