Latest Marathi News

“अजितदादा, आपल्या स्वार्थासाठी सर्व ठिकाणी settlement करणाऱ्यांना धर्मासाठी….”: ‘यांचा’ अजित पवारांना टोला!

0 173

नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नसून स्वराज्यरक्षक होते. त्यांना धर्मवीर म्हणणे चुकीचे आहे, असे वक्तव्य केले. त्यावरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांचा ट्विटरवरून समाचार घेतला आहे.

“अजितदादा, आपल्या स्वार्थासाठी सर्व ठिकाणी settlement करणाऱ्यांना काय कळणार धर्मासाठी त्याग काय असतो ते ?, होय धर्मवीरच! छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांना मानाचा मुजरा. असे ट्वीट करत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांना लगावला.

Manganga

 

दरम्यान, दोन दिवसांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांचा राज्यातील चंद्रपूर व संभाजीनगर येथे दौरा आहे. त्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष तयारीत प्रदेश कार्यालयात व्यस्त आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!