मुंबई: बॉलिवूडसाठी २०२२ खूप खास होते. गेले काही दिवस कियारा आणि सिद्धार्थ लग्न करणार असल्याची चर्चा आहे. सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. दोघांनीही याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ आणि कियारा फॅशन डिझाईनर मनिष मल्होत्राच्या घरी गेले होते. त्यानंतर त्यांच्या लग्नाला कोण असणार, लग्न कुठे होणार याविषयीच्या बातम्यांनी जोर धरला होता.
माहितीनुसार, एका वृत्तपत्राने सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाची तारीख जाहीर केली आहे. तसेच ही बातमी खरी असल्याचा दावा देखील केला आहे. या वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार सिद्धार्थ आणि कियारा ६ फेब्रुवारी २०२३ ला लग्नबंधनात अडकणार आहेत. ४ फेब्रुवारीपासून त्यांचे लग्नापूर्वीचे कार्यक्रम सुरू होणार आहेत. या सर्व कार्यक्रमात त्यांचे कुटुंबीय आणि काही खास पाहुणे सहभागी होणार आहेत

दरम्यान, कियारा आणि सिद्धार्थचे लग्न अत्यंत कटेकोट सुरक्षा व्यवस्थेत राजस्थान येथील आलिशान जैसलमेर पॅलेस हॉटेलमध्ये होणार आहे.