Latest Marathi News

BREAKING NEWS

“ही गोष्ट करू नका थेट मुख्यमंत्री होता येतं”: देवेंद्र फडणवीस!

0 276

बीड: दिवंगत शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी सुरू केलेल्या व्यसणमुक्ती कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणा दरम्यान व्यसनमुक्तीच्या कार्यक्रमात मोठं विधान केले आहे.

 

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, 2015 साली मी मुख्यमंत्री होतो तेंव्हा व्यसनमुक्तीचा कार्यक्रम करायचा संकल्प केला, 31 डिसेंबर रोजी दारू आणि इतर व्यसनाची पार्टी केली जाते. चरश गांजा ओढण्याचा प्रयत्न करतात, म्हणून दारू नाही तर मसाला दूध घेतले पाहिजे, ही संकल्पना विनायक मेटे यांची होती.आज कार्यक्रमाला आलो मात्र दुर्दैवाने मेटे साहेब नाहीत, ज्योतीताई मेटे यांनी मला फोन करून निमंत्रन दिलं, हा वसा तुम्ही पुढ नेताय म्हणून या कार्यक्रमाला आलोय.व्यसन नाही केलं तर माणूस मुख्यमंत्री बनतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हणत विनायक मेटे यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी ताकतीने शिवसंग्राम च्या मागे राहणार असल्याचे म्हंटले आहे.

Manganga

 

दरम्य, या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. यावेळी बोलत असतांना देवेंद्र फडणवीस यांना गोपीनाथ मुंडे यांचीही आठवण झाली होती. त्यांना नमन करत स्वर्गीय विनायक मेटे यांना आदरांजली वाहिली होती.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!