“अजित पवारांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याबाद्द्ल केलेल्या ‘या’ वक्तव्यामुळे महाराष्ट्रात उद्रेक होईल”: शंभुराजे देसाई!
मुंबई: शिंदे गटातील नेते शंभुराजे देसाई यांनी आज साताऱ्यात पत्रकारपरिषद घेतली. यावेळी अजित पवार यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी केलेल्या विधानाचा त्यांची चांगलाच समाचार घेतला.
शंभुराजे देसाई म्हणाले, ‘छत्रपती संभाजीराजे यांना स्वराज्य रक्षक म्हणा धर्मवीर म्हणू नका हे अजित दादांच बोलणं चुकीचं आहे. त्यांना धर्मवीर हे नाव आज नाही तर इतिहासानं दिलेलं आहे. संभाजीराजेंनी हिंदु धर्म रक्षणासाठी देहाचं बलिदान दिलं आहे. त्यामुळे त्यांना स्वराज्य रक्षक आणि धर्मवीर म्हणायला पाहिजे, असं शंभुराजे देसाईंनी म्हटलं आहे.

तसेच ते पुढे म्हणाले, ‘एकीकडे महापुरूषांचा आदर करा असं सांगायचं आणि दुसरीकडे संभाजीराजेंना धर्मवीर म्हणू नका असं म्हणायचं, हे चुकीचं आहे. लोका सांगे ब्रम्हज्ञात स्वत: मात्र कोरडे पाषाण अशा प्रकारचं वक्तव्य अजितदादांचं आहे. त्याची निंदा करावी तेवढं कमीच आहे. महाराष्ट्रामध्ये या वक्तव्याचा मोठ्या प्रमाणावर उद्रेक होईल आणि दादांना लक्षात येईल आपण बोललो हे चुकीचे आहे’, अशी टीका शंभुराजे देसाई यांनी केली.