मुंबई: उद्यापासून नवीन वर्षाला सुरूवात होईल. दरम्यान, नव्या वर्षाच्या सुरूवातीलाही काही महत्वाचे बदल होणार आहे. या बदलाचा परिणाम थेट तुमच्या जीवनावर होईल.
नवीन वर्षात खालीलप्रमाणे बदल होणार:
२०२३ मध्ये एमजी मोटर, मारुति सुजुकी, ह्युंडई मोटर्स, होंडा, टाटा मोटर्स, रेनॉल्ट, ऑडी आणि मर्सिडीज-बेंच या प्रमुख ऑटोमोबाईल कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे.

तसेच, रिझर्व्ह बँकेने सर्वसामान्यांच्या सुविधेसाठी बँक लॉकरसंबंधित नवे नियम जाहीर केले, ज्याची १ जानेवारी २०२३ पासून अंमलबजावणी केली जाईल. नियम लागू झाल्यानंतर लॉकरबाबत बँकेच्या मनमानी कारभाराला ब्रेक लागेल. बँक लॉकरमध्ये ठेवलेल्या मालाचे नुकसान झाले तर त्याची जबाबदारी आता बँकेची असेल.
नवीन वर्षात तुम्हाला तुमचे आधारकार्ड पॅनकार्डसोबत जोडणे बंधनकारक आहे. ज्या लोकांनी हे काम केलं नाही, त्यांचे पॅनकार्ड रद्द होऊ शकते. हा बदल जानेवारीऐवजी एप्रिलच्या पहिल्या तारखेपासून लागू होणार आहे.
नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच गँस सिलिंडरच्या किंमतीत बदल होऊ शकतो.
नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच क्रेडिट क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहे. हा बदल क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यावर मिळालेल्या रिवॉर्ड पॉइंटशी संबंधित असेल. ग्राहकांना ३१ डिसेंबर २०२२ पूर्वी त्यांच्या क्रेडिट कार्डमध्ये उर्वरित सर्व रिवॉर्ड पॉइंट्स भरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. १ जानेवारी २०२३ पासून नवीन नियमांनुसार रिवॉर्ड पॉइंट सुविधा प्रदान केल्या जातील.