Latest Marathi News

धावत्या बसमध्ये चालकाला ह्रदयविकाराचा झटका येऊन ; ९ जणांचा जागीच मृत्यू!

0 567

गुजरात: भरधाव वेगात असणाऱ्या बसच्या चालकाला अचानक ह्रदयविकाराचा झटका आला. यानंतर चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस थेट समोरून येणाऱ्या कारला धडकली. या घटनेत ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अनेकजण जखमी झाले आहेत.

 

याबद्दल अधिक माहिती अशी कि, गुजरातमधील नवसारी जिल्ह्यात शनिवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातग्रस्त बस ही सूरतहून वलसाडच्या दिशेने जात होती. त्याचवेळी समोरून येणाऱ्या फॉर्च्यूनर कारमधून ९ जण प्रवास करीत होते. दरम्यान, बस वेस्मा गावाजवळ आली असता, बसचालकाला अचानक ह्रदयविकाराचा झटका आला. त्यामुळे चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि बसने थेट फॉर्च्यूनर कारला धडक दिली. यामध्ये कारमधील ९ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर बसमधील काही प्रवासी गंभीर जखमी झाले.

Manganga

 

 

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही वाहनांमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढले. यानंतर जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!