Latest Marathi News

BREAKING NEWS

आजचे राशीभविष्य, शनिवार ३१ डिसेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 672

मेष:-
तुमच्या समस्यांचे निराकरण होईल. भविष्याची फार चिंता करू नका. मानसिक दृष्ट्याट सक्षम बनाल. जवळच्या नातेवाईकाचा सल्ला मोलाचा ठरेल. काही प्रश्न लवकरच निकालात निघतील.

 

 

वृषभ:-
देवाणघेवाण करताना सावध राहावे. भावंडांसोबत वेळ मजेत घालवाल. लहान भावाला दूर गावी जावे लागेल. मनात उगाच नसत्या चिंता आणू नका. वेळेचा सदुपयोग करावा.

Manganga

 

मिथुन:-
भावंडांसोबत नवीन काम सुरू करू शकता. आज सुखद अनुभव येतील. चर्चा सकारात्मक असेल. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. कौतुकाने अधिक चांगली प्रेरणा मिळेल.

 

कर्क:-
दिवस धावपळीत जाईल. वायफळ बडबड करणार्यां पासून दूर राहावे. एखादी नवीन जबाबदारी अंगावर पडू शकते. आपल्या कामावर लक्ष केन्द्रित करावे. घरातील कामासाठी थोडा वेळ काढावा लागेल.

 

सिंह:-
इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. आरोग्यात सकारात्मक बदल दिसून येतील. परोपकाराची जाणीव ठेवाल. कामानिमित्त घरापासून दूर जावे लागेल. प्रवासात वेळेचे भान राखावे.

 

कन्या:-
द्विधा मनस्थितीतून बाहेर यावे. आज दिवस संमिश्र जाईल. अति विचार करणे टाळावे. अनपेक्षित लाभ मिळू शकतात. मात्र फार हुरळून जाऊ नका.

 

तूळ:-
पत्नीला खुश करता येईल. शत्रूलाही आज मित्र बनवू शकाल. उत्तम वैवाहिक सौख्य लाभेल. इतरांवर तुमची चांगली छाप पडेल. कामाच्या ठिकाणी आज चांगले परिणाम पहायला मिळतील.

 

वृश्चिक:-
विद्यार्थ्यांना दिवस चांगला जाईल. आज मनाची संवेदनशीलता दाखवाल. अभ्यासातून मन विचलीत होऊ देऊ नका. शब्दांचे वजन लक्षात घ्यावे. लहान सहान गोष्टींना फार महत्त्व देऊ नका.

 

धनू:-
आवडत्या गोष्टी करायला वेळ मिळेल. आजचा दिवस प्रसन्नतेत जाईल. प्रेमी युगुलांना दिवस सुखद जाईल. मनातील इच्छा पूर्ण करता येईल. लॉटरी लागू शकते.

 

मकर:-
जुन्या गोष्टी आठवत बसू नका. आपली क्षमता ओळखून काम करावे. कामाचा उरक वाढवावा. आळस झटकावा लागेल. अति स्पष्ट बोलणे टाळावे.

 

कुंभ:-
पराक्रमाला चांगला वाव आहे. जवळचा प्रवास चांगला होईल. नातेसंबंधात सुधारणा होईल. तुमच्या हातातील काम पूर्ण होईल. अधिक धीटपणे काम कराल.

 

मीन:-
घरातील ज्येष्ठ मंडळींशी चर्चा करावी. आपले मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी ध्यान करावे. कौटुंबिक सौख्यात भर पडेल.व्यायामाला कंटाळा करू नका. आवडते पदार्थ खाल.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!