नागपूर : राज्य शासनाला आर्थिक व अन्य अनुषंगिक मुद्द्यांवर सल्ला देण्यासाठी सरकारने ‘आर्थिक सल्लागार परिषद’ स्थापन केली आहे. या परिषदेत एकूण २१ सदस्यांची निवड केली असून परिषदेचे अध्यक्षपद टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांकडे देण्यात आले आहे.
माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्याप्रमाणे देशाची अर्थव्यवस्था २०२७ पर्यंत पाच लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचवायची असेल तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ लाख कोटीपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट सरकारने बाळगले आहे. परिणामी हे उद्दिष्ट पूर्ण करताना राज्याचे देशांतर्गत उत्पादन पुढील ५ वर्षांत वाढवण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आराखडा ही आर्थिक सल्लागार परिषद तयार करणार आहे.

दरम्यान, या परिषदेमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे कार्यकारी संचालक अनंत अंबानी आणि अदानी पोर्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी करण अदानी यांचा समावेश केल्याने राजकीय क्षेत्रात विविध चर्चांना उधाण आलं आहे.