पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावी व इयत्ता दहावी फेब्रुवारी-मार्च 2023 परीक्षेचं अंतिम वेळापत्रक जाहीर केलं आहे.
बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या वेळेत घेण्यात येणार आहे.तर दहावीची परीक्षा २ मार्च ते २५ मार्च या दरम्यान घेण्यात येणार आहे. इयत्ता बारावी आणि इयत्ता दहावीचे लेखी परीक्षांची संभाव्य वेळापत्रके मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर सप्टेंबरपासून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. वेळापत्रकांबाबत सूचना असल्यास मंडळाकडे १५ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात मागविण्यात आलेल्या होत्या.

दरम्यान, संघटना, पालक, शिक्षक यांचेकडून प्राप्त झालेल्या सूचनांचे अवलोकन करून इयत्ता बारावी व इयत्ता दहावीची वेळापत्रके अंतिम करण्यात आलेली आहेत.