मुंबई: आज शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली.
यावेळी ते म्हणाले, “अनिल देशमुख हे महाराष्ट्राचे गृहमंत्री होते, त्यांनी अनेक मोठ्या नेत्यांसोबत काम केले आहे. विदर्भात त्यांनी नेतृत्व केले आहे. ज्या पद्धतीने मला, अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यावर सत्तेचा गैरवापर केला. पण, आम्ही कायद्याची लढाई करुन घरी पोहोचलो. कायदा काय सांगतो दहशतवादी निर्माण करणाऱ्यांसाठी हा कायदा केला. असा प्रसंग आमच्यावर आला, त्यावेळी आमच्या कुटुंबावर कशी वेळ आली असेल सांगू शकत नाही. अशी वेळ शत्रुवरही येऊ नये, असं खासदार संजय राऊत म्हणाले.

दरम्यान, ‘अनिल देशमुख ज्या संकटातून गेले आहेत. त्या संकटातून मीही गेलो आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा सातत्याने गैरवापर सुरू आहे. अनिल देशमुखांची कारकीर्द निष्कलंक आहे. सरकार कायद्याचा गैरवापर करत आहे, असंही संजय राऊत म्हणाले.