Latest Marathi News

ऋषभ पंतच्या अपघातानंतर उर्वशी रौतेलाची खास पोस्ट व्हायरल!

0 751

मुंबई: शुक्रवारी पहाटेच्या सुमारास क्रिकेटर ऋषभ पंतच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात ऋषभ गंभीर जखमी झाला. तो लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी सोशल मीडियावर चाहते प्रार्थना करत आहेत. यादरम्यान अभिनेत्री उर्वशी रौतेलाने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. मात्र या फोटोच्या कॅप्शनने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

 

उर्वशीने इन्स्टाग्रामवर तिच्या एका फोटोशूटचा फोटो पोस्ट केला आहे. सुरुवातीला तिने या फोटोच्या कॅप्शनमध्ये फक्त दोन इमोजी पोस्ट केले होते. मात्र ट्रोल झाल्यानंतर तिने कॅप्शन एडिट केलं. तिकडे ऋषभ अपघातात जखमी झाला असताना तू फोटो काय पोस्ट करतेय, अशा शब्दांत चाहत्यांनी तिच्यावर टीका केली. त्यानंतर तिने कॅप्शन एडिट करत लिहिलं, ‘प्रार्थना करतेय.’

Manganga

 

 

कॅप्शन एडिट केल्यानंतरही उर्वशीला ट्रोलिंगचा सामना करावा लागतोय. ‘या पोस्टमागचा उद्देश म्हणजे आरपीच्या (ऋषभ पंत) अपघातानिमित्त स्वत:कडे लक्ष वेधणं आहे’, असं एकाने लिहिलं. तर ‘तू कॅप्शन का एडिट केला’ असा सवाल दुसऱ्या युजरने केला.

 

 

दरम्यान, उर्वशी रौतेलाने एका मुलाखतीत ‘आरपी’ असा उल्लेख केल्यापासून या दोघांच्या अफेअरची चर्चा सुरू झाली. उर्वशीचा आरपी हा ऋषभ पंतच आहे, अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरू झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!