मुंबई: तुम्हाला जर तुमच्या त्वचेची योग्य काळजी घ्यायची असेल तर तुम्ही त्वचेसाठी एलोवेराचा वापर करू शकता. दरम्यान, एलोवेराचे वेगवेगळे फेस पॅक खालीलप्रमाणे बनवा.
या फेसपॅकला बनविण्यासाठी तुम्ही एका वाटीत बारीक केलेली मसूर डाळ घ्या. त्यात टोमॅटोचा रस आणि ताज्या एलोवेराचा बारीक केलेला किस टाकून हे मिश्रण एकत्रित करा. या फेसपॅकला तुम्ही चेहऱ्यावर 10 ते 15 मिनिटं लावून ठेवा. आणि नंतर चेहरा स्वच्छ धुवा. चेहऱ्यावर जमा होणारी धूळ स्वच्छ करण्यासाठी हा फेसपॅक तुमच्या उपयोगी आहे.

तसेच, एक चमचा एलोवेरा जेलमध्ये तेवढ्याच प्रमाणात हळद घालून मिक्स करा. याला तुम्ही पाणी किंवा गुलाबजलच्या मदतीने मिक्स करू शकता. ही पेस्ट तयार झाल्यानंतर ती 20 मिनिटं चेहऱ्यावर लावून ठेवा. हा फेसपॅक चेहऱ्याव लावल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर ग्लो तर येईलच पण त्याचबरोबर इतर समस्याही दूर होण्यास मदत होईल.
तसेच, एका वाटीत एलोवेराचा किस किंवा एलोवेरा जेलचा वापर करा. यामध्ये गुलाबजल घालून मिश्रण तयार करा. आणि 20 मिनिटं चेहऱ्यावर लावून नंतर चेहरा स्वच्छ धुवा. या फेसपॅकने तुमच्या चेहऱ्यावरील सर्व डाग दूर होण्यास मदत होईल.