Latest Marathi News

BREAKING NEWS

अखेर पोलीस तपासात झाले उघड; ‘असा’ झाला ऋषभ पंतच्या कारचा अपघात!

0 941

डेहराडून: टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर ऋषभ पंतच्या कारला दिल्ली-डेहराडून हायवेवर रुडकी जवळ अपघात झाला. ऋषभची कार डिवायडरला धडकली. धडकेनंतर कार पलटली. त्यानंतर कारला आग लागली. पंत कसाबसा कारच्या बाहेर पडला. त्यामुळे त्याचा जीव वाचला. ऋषभला या अपघातात गंभीर जखमा झाल्या आहेत. त्याच्या पायाला सुद्धा फ्रॅक्चर आहे.

 

माहितीनुसार, ऋषभ पंत रुडकी येथे आपल्या नातेवाईकाला भेटण्यासाठी चालला होता. त्यावेळी स्टेअरिंगवर असताना ऋषभचा डोळा लागल्यामुळे हा भीषण अपघात झाला. कार रुडकीच्या दिशेने असताना, नारसानपासून 1 किलोमीटर अंतरावर पहाटे 5.30 च्या सुमारास हा अपघात झाला, त्यालाआधी रुडकीच्या सक्षम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर डेहराडूनच्या रुग्णालयात हलवलं. तो स्वत: कार चालवत होता. तो गाडीत एकटाच होता” अशी माहिती पोलीस अधिकारी एसके सिंह यांनी दिली.

Manganga

 

दरम्य, ऋषभ पंतवर डेहराडूनच्या मॅक्स रुग्णालयात उपचार करण्यात येतील. गरज पडल्यास, त्याला एक-दोन दिवसात दिल्लीच्या रुग्णालयात त्याला हलवण्यात येईल. दिल्ली आणि डिस्ट्रीक्ट क्रिकेट असोशिएशनने ही माहिती दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!