मुंबई: ऑनलाईन खरेदीसाठी सर्वात स्वस्तात फ्लिपकार्टवर वस्तू मिळतात. आता फ्लिपकार्टने लॅपटॉपसाठी दिलेली ऑफर ऐकूण तुम्ही देखील थक्क व्हाल. मध्यमवर्गीय आणि गरिबांना एवढे पैसे खर्च करून लॅपटॉप खरेदी करता येत नाही. त्यामुळे फ्लिपकार्टने यंदा फक्त ६००० रुपयांत लॅपटॉपची ऑफर ठेवली आहे.
माहितीनुसार, फ्लिपकार्ट इयर एंड सेल अंतर्गत ही ऑफर ठेवण्यात आली आहे. यात तुम्हाला अनेक वस्तूंवर आर्षक ऑफर देण्यात आल्या आहेत. तसेच लॅपटॉपची किंमत फक्त ६,१९० रुपये ठेवण्यात आली आहे. Asus कंपनीचा लॅपटॉप फ्लिपकार्टवर निम्म्याहून कमी किंमतीला मिळत आहे. त्यामुळे या वर्षी लॅपटॉप खरेदीचे स्वप्न पूर्ण होऊ शकते.

दरम्यान, Asus क्रोमबॅक सेलेरॉन ड्युअल कोर लॅपटॉपमध्ये 4 GB रॅम आहे. तसेच 64 GB EMMC स्टोअरेज देण्यात आला आहे. याची मूळ किंमत २५,९९० रुपये इतकी आहे. मात्र फ्लिपकार्टने २८ टक्के ऑफ करत हा लॅपटॉप ऑफरमध्ये काढला आहे. मात्र, तुम्ही फ्लिपकार्टच्या ह्या ऑफरचा लाभ ३१ तारखे पर्यंतच घेऊ शकता.