मुंबई: टीम इंडियाचा विस्फोटक फलंदाज ऋषभ पंत यांच्या कारला शुक्रवारी (३० डिसेंबर) पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. दिल्लीहून उत्तराखंडच्या दिशेने निघालेल्या ऋषभ पंतची कार रुरकी येथे उलटली. अपघातात कार तीन ते चारवेळा उलटली. त्यानंतर कारने पेट घेतला.
अपघातानंतर ऋषभ पंतला दिल्लीतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी पंतला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. आता सध्या त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. त्याचा डावा पाय फ्रॅक्चर झाला असून पाठीला आणि मानेवर गंभीर दुखापत झाली आहे. त्याची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

Cricketer #RishabhPant has survived a serious car accident on Delhi-Dehradun highway.
His car burst into flames. 1st visual. pic.twitter.com/pVd17KEELN
— Shubhankar Mishra (@shubhankrmishra) December 30, 2022
दरम्यान, या भीषण अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता समोर आला आहे. या व्हिडीओत ऋषभ पंतची कार भरधाव वेगात येताना दिसत आहे. अचानक त्याचं कारवरील नियंत्रण सुटतं आणि कार थेट रस्त्यावरील डिव्हायरला धडक बसते. त्यानंतर कार तीन ते चारवेळा उलटते. त्यानंतर कार पेट घेत पूर्णपणे जळून खाक होते. पंत कारमधून वेळेवर बाहेर पडला. त्याने कारची काच फोडून बाहेर उडी घेतली.