औरंगाबाद: पुणे महामार्गावर बहिणीला पळवून नेल्याच्या रागातून भावाने भरदिवसा एका तरुणांची कुऱ्हाडीचे वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. बापू खिल्लारे (वय 30 वर्ष) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, बापू खिल्लारे याने ३ वर्षापूर्वी सासरच्या नातलगांचा विरोध झुगारून पळून जाऊन एका तरुणीशी प्रेम विवाह केला होता. गुरूवारी (29 डिसेंबर) बापू हा औरंगाबाद-पुणे महामार्गावरून दुचाकीने जात असताना त्यांच्या मेव्हण्याने महामार्गावरील दहेगाव बंगला जवळील इसारवाडी फाटा येथे अडविलं कुठलिही विचारपूस न करता धारदार कुऱ्हाडीने बापू यांच्यावर हल्ला चढविला. आरोपीने बापू याच्यावर कुऱ्हाडीने एका नंतर एक असे सपासप वार केले. यामध्ये बापू हा रस्त्यावरच कोसळला. तडफडणाऱ्या बापू खिल्लारे याने रस्त्यावरच जीव सोडला. त्याच्या मृत्युची खात्री होताच मारेकऱ्यानं अंगावरील शर्ट काढला आणि तो शर्ट हवेत गोल फिरवत जल्लोष केला. तेथे नृत्य केलं आणि दुचाकीवरुन तिथून पसार झाला.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बापू याचा मृतदेह आपल्या ताब्यात घेतला. हत्येनंतर आरोपी पसार झाला असून पोलिसांनी त्याच्या शोधात दोन पथके रवाना केली आहे.