नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांनी वयाच्या १०० व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. स्वत: पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या निधनाची माहिती ट्विट करत दिली आहे.
माहितीनुसार, बुधवारी हीराबेन मोदी यांची प्रकृती खालावली होती, त्यानंतर त्यांना अहमदाबादमधील यूएन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले. गेल्या ४ दिवसांपासून त्यांच्या उपचार सुरू होते. आईला भेटण्यासाठी पंतप्रधान मोदी हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते. मात्र, आज पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी ट्विट करून आईला श्रद्धांजली वाहिली आहे. आणि आता ते आईला भेटण्यासाठी दिल्लीहून अहमदाबादच्या दिशेने रवाना झाले आहेत.