Latest Marathi News

BREAKING NEWS

आटपाडी : हिंदू धर्म रक्षक मोर्चास आम. राम सातपुते उपस्थित राहणार

0 121

आटपाडी : आटपाडी येथील रुग्णावर जादूटोणा भोंदूगिरीने उपचारासह धर्मांतराचा आरोप असलेला संजय गेळे व अश्विनी गेळे या पती-पत्नीवर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी आज शुक्रवार दिनांक ३० रोजी हिंदू धर्म रक्षक मोर्चा काढण्यात येणार असून सदर मोर्चास भाजपचे आम. राम सातपुते हे उपस्थित राहणार आहेत.

वरद हॉस्पिटलमधील अतिदक्षता विभागात रुग्णांचे नातेवाईक असल्याची खोटी माहिती देवून गेळे पती-पत्नीने दवाखान्यातील आयसीयूमध्ये विनापरवानगी प्रवेश केला. सोनाली शिवदास जिरे (१८, रा. मापटेमळा आटपाडी) हिच्या कपाळावरून बोटे फिरवून टॅबमधील मजकूर वाचून बोटाने शस्त्रक्रिया करीत असल्याचे भासवत धर्म परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप हिंदू संघटनांनी करत पोलिसात तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी आटपाडी बंद ही करण्यात आली होती.

Manganga

आज सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू धर्म रक्षक मोर्चा निघणार असून सदरचा मोर्चा हा आटपाडी बस स्थानक पासून सुरु होणार असून मेन व्यापारी पेठ, बाजार पटांगण मार्गे आटपाडी पोलीस स्टेशन असा काढण्यात येणार आहे. सदर मोर्च्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समस्त हिंदू समाजाच्या.वतीने करण्यात आले असून या मोर्चास राम सातपुते हे उपस्थित राहणार असून त्यांनी तसे त्यांच्या अधिकृत ट्वीटर अकाऊंट वरून पोस्ट केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!