मुंबईः मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयातील शिवसेना पक्ष कार्यालयावर बाळासाहेब शिवसेना अर्थात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून काल ताबा घेण्यात आला आहे. त्यामुळे आता शिवसेना भवनाचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.दरम्यान, याबाबत खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना भवनबाबत खासदार संजय राऊत म्हणाले, शिंदे गटाचा बाप जरी आला तरी शिवसेना भवनमध्ये घुसू शकत नाही असा थेट इशारा त्यांनी शिंदे गटाला दिला आहे.
दरम्यान, संजय राऊत यांच्या या विधानावर शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी शिवसेना कार्यालयांचा ताबा शिंदे गट साहजिकच घेणार असा दावा केला आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, महानगरपालिका असो, विधानसभा असो किंवा लोकसभा असो या ठिकाणी मिळणारी पक्ष कार्यालयं असतात ती त्या त्या पक्षातील सदस्यसंख्येवरून त्या त्या पक्षांना ही कार्यालयं मिळत असतात. त्यामुळे मुंबईतील शिवसेना कार्यालया ताबा मिळवणे ही गोष्ट कायदेशीररित्या बरोबर आहे. त्यामुळे त्यांची संख्या आता कमी झाल्या असल्यामुळे आता पक्ष कार्यालय घेण्यात आल्याच प्रतापराव जाधन यांनी सांगितले.