आटपाडीच्या लेखिकेचे कथानक चोरले : ‘शेतकरीच नवरा हवा’मालिका वादाच्या भोवऱ्यात : पोलिसात तक्रार दाखल
त्यांची ‘शेतकरी नवरा’ ही कादंबरी 2017 ला प्रसिद्ध झालेली आहे. ही कादंबरी अनेक वाचकांच्या पसंती आहे.
आटपाडी : येथील लेखिका मेघा पाटील यांनी कलर्स मराठी वाहिनीवरील ‘शेतकरीच नवरा हवा’या मालिकेची कथा चोरल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी त्यांनी आटपाडी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे ही मालिका आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
मेधा पाटील या साहित्यिक आहेत. त्यांचे अनेक काव्यसंग्रह आणि कादंबऱ्या, पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यापैकीच त्यांची ‘शेतकरी नवरा’ ही कादंबरी २०१७ ला प्रसिद्ध झालेली आहे. ही कादंबरी अनेक वाचकांच्या पसंती आहे. परंतु या कादंबरीवरील असणारे नाव आणि कादंबऱ्यातील कथा चोरुन कलर्स वाहिनीवरील मालिकेमध्ये ते वापरण्यात आल्या आहेत. यासाठी मेघा पाटील यांनी कोणतीही पूर्व कल्पना अथवा कोणतेही हक्क मालिकेच्या निर्मात्यांनी घेतले नसल्याचा आरोप आरोप मेधा पाटील यांनी केला आहे. त्यामुळे मेधा पाटील यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन निर्मात्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.

याप्रकरणी आटपाडी पोलिसांनी चौकशी सुरु केली असून यात कॉपीराईट कायद्याचा भंग झाला आहे का याबद्दल पोलिसांकडून तपास सुरु असून आटपाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजित पाटील यांनी सांगितले आहे.