आटपाडी : आटपाडी तालुक्यातील उंबरगाव येथे गळफास घेत एकाने आत्महत्या केल्याची घटना घडल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होते आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, उंबरगाव येथे बंडू कोंडीबा दडस (व.व.३५) हा कुटुंबांसह राहत होता. त्याच्या पश्चात आई वडील, भाऊ, पत्नी एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. आज दिनांक २९ रोजी पहाटेच्या सुमारास नैराश्यातून गळफास घेत आत्महत्या केली.
