नागपूर : आज विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.
यावेळी फडणवीस म्हणाले, “आपण काही सूचना महिला मंत्र्यांच्या संदर्भात केल्या आहेत. त्या अंत्यंत गंभीरपणे घेत आहोत. आम्ही आता मंत्रिमंडळाचा विस्तार करू. मुख्यमंत्री शिंदे यांना विनंती करणार आहोत. पहिल्यांदा महिला मंत्रीचं घ्यायचे. जोपर्यंत महिला मंत्री नाही तोपर्यंत कोणीही कोट शिवला असला तरी त्या कोटाचा उपयोग नाही. तसेच, महाविकास आघाडी सरकारच्या काळात चार महिला मंत्री होत्या. आम्ही त्यापेक्षा जास्त करू शकतो, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, अजित पवार यांनी दिलेल्या सूचनांचा अवलंब केला जाईल, असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.