मुंबई: राज्यात भाजपने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात लोकसभेसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. तर दुसरीकडे भाजप कल्याण लोकसभा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांचा पराभव करण्याच्या प्रयत्नात आहे, असा दावा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
चंद्रकांत खैरे म्हणाले, ‘भाजपा लोकसभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गेम करणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांना लोकसभा निवडणुकीसाठी पाडण्यासाठी सुद्धा भाजप प्रयत्न करत आहे. तर भाजपमधील कार्यकर्ते देखील मला भेटून नाराजी व्यक्त करत आहेत. शिंदेंच्या मंत्र्यांमुळे भाजपाची प्रतिमा मलिन होत आहे, असे चंद्रकांत खैरे म्हणाले.
दरम्यान, खैरे यांनी ऑनलाइन ईव्हीएम मशीनवर पद्धतीवर शंका उपस्थित केली.