नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांना टोला लगावला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, ते विरोधी पक्षनेते म्हणून दादांनी सांगितलं एकदा अमृताशी बोला. पण, दादा हे सांगताना तुम्ही सुमित्राताईंशी विचारलं होतं का. दादांनी अनेक गोष्टींची चर्चा केली.
कोण मुख्यमंत्री झाले, किती मुख्यमंत्री झाले. पण, एका गोष्टीचं दुःख आहे. संधी मिळाली असताना तुम्हाला मुख्यमंत्री नाही केलं. २००४ ला तुम्हाला मुख्यमंत्री होण्याची संधी होती. तुमचे जास्त लोकं निवडून आले होते. कराराप्रमाणे ज्याचे जास्त आमदार त्यांचा मुख्यमंत्री होता. पण, ती संधी काही तुम्हाला मिळाली नाही, देवेंद्र फडणवीस म्हणाले.

तसेच ते पुढे म्हणाले, “आता कालबद्ध कार्यक्रम करू. उर्वरित निधीही सरकार देत आहे. गोसेखुर्द, लोवर वर्धा, मुळा अशा महत्त्वाच्या प्रकल्पांना निधी दिला. वीस वर्षांपासून अडकलेल्या प्रकल्पांना निधी दिला. चुलबंद, सतरापूर, मोकाबर्डी, सोनापूर, बोरघाट, तळोधी मोकासा, राजेगाव काटी अशा प्रकल्पांना चालना दिली, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले .