नागपूरः हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या टप्प्यात उद्धव ठाकरे आणि शिंदे गटातील मंत्री दीपक केसरकर हे आमने सामने आले. यावेळी तुम्ही एवढे निर्दयीपणे आमच्याशी कसे वागू शकतात, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केल्याचंही सांगण्यात येत आहे.
माहितीनुसार, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांची आज दीपक केसरकर यांनी भेट घेतली. या भेटीबद्दलही अनेक चर्चा सुरु आहेत. या भेटीदरम्यानच उपसभापतींच्या दालनात उद्धव ठाकरे आणि दीपक केसरकर हे आमने सामने आले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, “तुम्हाला एवढं मोठं केलं…आम्ही तुमचं काय वाईट केलंय? तुम्ही आमच्याशी एवढे निर्दयीपणे कसे वागू शकतात, असा सवाल ठाकरे यांनी केला.

दिशा सालियान मृत्यू प्रकरणाच्या चौकशांवरूनच उद्धव ठाकरे यांनी दीपक केसरकर यांना हे सवाल विचारले असावेत, अशी शक्यता आहे.