नागपूर:विधिमंडळाचं अधिवेशन होत आहे. आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. दरम्यान आज उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
यावेळी ते म्हणाले, “सध्या महाराष्ट्रात टोळीचं राज्य आहे. त्यांनी याआधीच पक्ष चोरलाय. दुसऱ्याचे वडील चोरलेत. या टोळीची नजर सध्या संघाच्या कार्यालयावर पडली आहे. त्यामुळे RSS ने आता वेळीच सावध व्हावं. आज शिंदे रेशीमबागेत येऊन गेलेत. तिथे लिंबू-टाचण्या कुठे पडल्या आहेत का ते पाहावं, असं उद्धव ठाकरे म्हणालेत.

तसेच ते पुढे म्हणाले, “मुंबई महाराष्ट्रापासून तोडायची भाषा भाजप आधीपासूनच करत आहे. कर्नाटकच्या भाजपच्या मंत्र्यानेच हा डाव जगासमोर उघड केला. त्यांच्या एका वक्तव्यातून भाजपच्या पोटातलं ओठावर आलं, असंही उद्धव ठाकरे म्हणालेत.