नागपूर : २०२४ मध्ये अजित पवारांचा करेक्ट कार्यक्रम होईल, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं होतं. त्यावर उत्तर देताना अजित पवारांनी बावनकुळेंना खोचक टोला लगावला आहे.
बावनकुळेंच्या वक्तव्याबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता, अजित पवारांनी उपरोधिक टोला लगावला. ‘अरे बापरे, मला बावनकुळे यांच्या विधानानंतर झोपच येईना हो..हे ऐकल्यापासून आमच्या सगळ्यांची झोप हरपली आहे. चंद्रशेखर बावनकुळेंसारखा एवढा मोठा ताकदीचा नेता अशा पद्धतीने आव्हान देतोय, मी तर विचार करतोय राजकारणच सोडून द्यावं. राजकीय संन्यास घ्यावा. २०२४ मध्ये असा अपमान होण्यापेक्षा संन्यास घेतलेला बरा. सांगा त्यांना’, असं अजित पवार म्हणाले.

दरम्यान, ते नागपुरात बोलत होते. त्यांच्या या विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे.