मुंबई: चीनमध्ये कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर भारतात सरकारने आवश्यक ती पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. भारतासाठी पुढचे 40 दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
ओमिक्रॉन सब व्हेरिएंट BF.7 आला तर, कोरोना केसेस अचानक वाढू शकतात. तसेच यावेळी मास्क घालणे अनिवार्य केले जाण्याची शक्यता देखील कमी आहे. सरकारी सूत्रांचे म्हणणे आहे की मृतांचा आकडा जास्त असण्याची शक्यता कमी आहे, परंतु रुग्णांची संख्या जास्त असू शकते.

दरम्यान, देशात कोविड रुग्ण बरे होण्याचे प्रमाण सध्या 98.8% आहे. गेल्या 24 तासात 141 रुग्ण बरे झाले आहेत तर गेल्या 24 तासात 188 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या देशात 3,468 कोविड रुग्ण उपचाराधीन आहे. गेल्या 24 तासात 1,34,995 चाचण्या करण्यात आल्या.