मुंबई:शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का देत मुंबई महापालिकेच्या शिवसेना पक्ष कार्यालयावर कब्जा केला आहे. शिवसेना पक्षकार्यालयाबाहेर यशवंत जाधव यांच्या नावावर लावलेला कागद हटवत पक्ष कार्यालयावर कब्जा केला आहे.
माहितीनुसार, आज, राहुल शेवाळे , शितल म्हात्रे, नरेश म्हस्के यांनी पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांची भेट घेतली. त्यानंतर शिंदे गटाने मुंबई महापालिकेच्या शिवसेना पक्ष कार्यालयावर दावा केला आहे. शिंदे गटाने पक्ष कार्यालयाबाहेर यशवंत जाधव यांच्या नावावर लावलेला कागद हटवत पक्ष कार्यालयावर कब्जा केला आहे.

दरम्यान, शिंदे गटाने मुंबई महापालिकेतील पक्ष कार्यालयावर दावा केल्यानंतर ठाकरे गट आमने सामने आले आहेत. त्यानंतर शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. शिंदे गटाने पालिकेच्या पक्ष कार्यालयावर दावा केल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.