पुणे : पुण्यातील दत्तवाडीमध्ये लग्नाला नकार दिल्याने २४ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. मृत तरुणी गर्भवती असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, मृत तरुणीचे संग्राम उर्फ पिट्या विलास पानसरे या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्यातून तरुणी गर्भवती राहिली होती. परंतु हा गर्भ दुसऱ्याचा आहे,असे म्हणत आरोपीने तिच्याशी लग्न करण्यास नकार दिला. तर इतरांनी तिचा छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच कारणामुळे तरुणीने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे.

दरम्यान, याप्रकरणी प्रियकर संग्राम पानसरे, त्याची आई, मावशी व शेजारील एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.