मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुखांची तुरुंगातून जामिनावर सुटका झाली आहे. ऑर्थर रोड कारागृहातून बाहेर पडल्यानंतर अनिल देशमुखांनी पहिली प्रतिक्रिया दिली.
अनिल देशमुख म्हणाले, ‘मला खोट्या आरोपांमध्ये फसवण्यात आलं आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माझ्यावर १०० कोटींच्या वसुलीचे खोटे आरोप केले. त्यांची चांदीवाल आयोगाकडे प्रतीज्ञापत्र सादर करत म्हटलं की, मी अनिल देशमुखांवर जे आरोप केले आहेत ते ऐकीव माहितीवर केले आहेत, माझ्याकडे याबाबत पुरावे नाहीत’, असे ते म्हणाले.

तसेच ते पुढे म्हणाले, ‘माझ्यावरील आरोपांत तथ्य नाही. न्यायपालिकेवर आमचा विश्वास आहे. शरद पवार साहेब सर्व नेते कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो. खोट्या गुन्ह्यात मला १४ महिने तुरुंगात राहावे लागले याचे दुःख आहे, से देशमुख म्हणाले.