Latest Marathi News

“देवेंद्र फडणवीस स्पायडरमॅन; अजितदादांनी त्यांच्याबद्दल बोलून…”: ‘यांचा’ अजित पवारांवर हल्लाबोल!

0 222

नागपूरः देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे-भाजप सरकारमध्ये एक दोन नाही तर तब्बल सहा खाती घेतल्याने अजित पवार यांनी पुन्हा एकदा हा मुद्दा बोलून दाखवल्याने भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांना चांगलंच सुनावले आहे.

 

 

नागपुरात बोलताना अजित पवारांना उद्देशून ते म्हणाले, ‘ आधी स्वतःबद्दल विचार करा. आपल्या पक्षाचं बघितलं पाहिजे. देवेंद्र जी उत्तम पद्धतीने स्पायडरमॅनप्रमाणे काम करत आहेत. अजितदादांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलून तोंडाच्या वाफा कमी केल्या पाहिजेत, असे ते म्हणाले.

Manganga

 

तसेच ते पुढे म्हणाले, “संपूर्ण लोकसभेत अजित दादा आणि त्यांच्या वागण्याबद्दल लोकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. माझी जशी एंट्री झाली, तशी अजित दादांना भीती वाटतेय. त्यांच्यात सामना करण्याची हिंमत नाही. २०२४ मध्ये त्यांचाच करेक्ट कार्यक्रम होईल, अशी शक्यता चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!