मुंबई: गौतमी पाटीलची लोकप्रियतेचा अंदाज तिच्या कार्यक्रमांना होणाऱ्या गर्दीवरुन येतो. अनेक गौतमीला कार्यक्रम स्थळावरुन बाहेर पडण्यासाठी पोलीस व्हॅनची मदत घ्यावी लागते. लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली गौतमी ठरवून नाही तर अपघातने या क्षेत्र आली आहे. एका वाहिनीला मुलाखतीत तिने ही माहिती दिली.
गौतमीला लहानपणापासून डान्सची आवड होती. त्यासाठी तिने डान्स क्लासही लावला होता. अनेकदा ती शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला होता. मात्र प्रोफेशन डान्स करण्याचं तिने असं काही ठरवलं नव्हतं. मात्र आईचा अपघात झाल्यानं घराची संपूर्ण जबाबदारी अचानक तिच्यावर आली होती. वडील सोबत नसल्याने तिच्यावर लहान वयातच मोठी जबाबदारी आली.

डान्स क्लासच्या माध्यमातून तिचे काही कॉन्टॅक्ट्स होते. तिथून तिने काही कार्यक्रम करण्यास सुरुवात केली. ऑर्केस्ट्रामध्ये काम करण्याचा विचार कधीही नव्हता. पण परिस्थितीमुळे यावं लागलं. आयुष्यात स्ट्रगल खूप केला आहे. लहाणपणापासून स्ट्रगल स्ट्रगल स्ट्रगलच सुरु आहे.
वडिलांची साथ नव्हती म्हणून मला हे करावं लागत आहे. वडील नीट असते तर मी इथे नसते. वडिलांची साथ असती परिस्थिती वेगळी असती, असं गौतमीने सांगितलं. आई सुरुवातील घाबरली होती, पण आता खुश आहे, असंही गौतमीने सांगितलं.
गौतमी खूप श्रीमंत झाली आहे. याबाबत बोलताना गौतमीने म्हटलं की, लोक सोशल मीडियावर माझा बंगला दाखवत आहे, कुणी लग्न झाल्याचं सांगत आहे. पण माझं मला माहिती माझी काय परिस्थिती आहे. कुणाकुणाला काय सांगायंचं माझी परिस्थिती मलाच माहित आहे. (सौ. साम)