अहमदनगर : अहमदनगर दक्षिणचे भाजपचे खासदार सुजय विखे पाटलांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.
खासदार सुजय विखे पाटील म्हणाले, “विधान भवनात हाऊस न चालून देणे, याचे एकमेव कारण म्हणजे मागच्या अडीच वर्षात हे कुठलेही काम करू शकले नाही. यांचे अडीच वर्ष उघडे पडतील; म्हणून स्वतःचा नाकर्तेपणा झाकण्यासाठी आंदोलन आणि कीर्तन करताय. हे कोविडमध्ये अडीच वर्ष जनतेसाठी रस्त्यावर उतरले नाही. मागच्या अडीच वर्षात काहीजण जेलमध्ये राहून मंत्री होते, अशीही टीका खा. विखे यांनी केली.

तसेच ते पुढे म्हणाले, “अहमदनगर जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली असून मर्डर होत आहेत. पोलिसांनी जे झाकले ते आम्ही उघडकीस आणल्याशिवाय राहणार नाही. विरोधकांनी मागच्या तीन वर्षांमध्ये सर्वसामान्य जनतेचा जो छळ केला हा छळ आम्ही उघडा पाडतोय. सत्ता गेल्यामुळे त्यांचा जीव घुटमळतोय म्हणून जास्त उद्रेक झालाय, अशा शब्दा तत्यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि निलेश लंके यांच्यावर निशाणा साधला आहे.