पुणेल: पुण्यात सहा जणांनी १५ वर्षीय मुलीचं अपहरण केलं. त्यानंतर एका लॉजवर नेऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून जय राजू तिंबोळे, ओम राजू तिंबोळे, किरण जावळे, शुभम सुनील जाधव, आणि अनिल जाधव, या आरोपींना अटक केली आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, जुलै ते डिसेंबर २०२२ या कालावधीत आरोपी अनिल जाधव याने चाकूचा धाक दाखवून पीडितेचं अपहरण केलं. त्यानंतर एका लॉजवर नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने पीडितेचे नग्न फोटो काढले. ते व्हायरल करण्याची धमकी देऊन इतर आरोपींसोबतही पीडितेला शारिरीक संबंध ठेवण्यास भाग पाडले. जुलै २०२२ पासून आरोपींच हे कृत्य सुरू होते.पीडितेला फोटो व्हायरल करण्याची धमकी देत, आरोपी तिच्यावर जबरदस्ती अत्याचार करत होते.

दरम्यान, अखेर पीडितेने याप्रकरणाची माहिती आपल्या कुटुंबीयांना दिली. कुटुंबीयांनी पीडितेला घेऊन तातडीने पोलीस ठाणे गाठले. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत सहा आरोपींना अटक केली आहे.