अहमदनगर: दीपाली सय्यद यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना ठार मारण्याचा कट रचल्याचा गंभीर दावा माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. अहमदनगरमध्ये पत्रकार परिषदेत त्यांनी हे गंभीर आरोप केले आहेत.
यावेळी भाऊसाहेब शिंदे म्हणाले, “दीपाली सय्यद ट्रस्टतर्फे होणारे व्यवहार चुकीचे आहेत, तसेच त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा जीवे मारण्याचा अयोध्या दौऱ्यात कट रचला होता. दिपाली सय्यद आणि भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी हा कट आखला होता त्या साठी अनेक वेळा दिपाली सय्यद दिल्लीला गेल्या होत्या. दिपाली सय्यद यांनी जवळपास 17 ते 18 दिल्लीच्या वाऱ्या केल्या होत्या असा गंभीर आरोप त्यांनी केला.

दरम्यान, माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी अहमदनगर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते.