नागपूर:आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मोठा गौप्यस्फोट केला. ज्या प्रकारे विरोधी पक्षाचा हल्ला सुरू आहे. त्यावरून सरकार नक्कीच पळ काढत आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली.
यावेळी राऊत म्हणाले, “भाजप आणि शिंदे गट दोघे मिळून सरकार चालवत आहे. पण प्रकरण एकाच गटाचं निघत आहे. त्यावरून फायली कोण देतंय हे समजून जा. आम्हाला भाजपचेच लोक फायली पुरवत आहेत, तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एनआयटी घोटाळा हे एक टोक आहे. अजून असंख्यप्रकरणं बाहेर येतील, असे ते म्हणाले.
तसेच ते पुढे म्हणाले, “आम्ही मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं विधानसभेत मांडली नाहीत. अनेक प्रकरणं आहेत. ही प्रकरणं देणारे तुमचेच सहकारी आहेत, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे, असा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, आजही अधिवेशनात विरोधकांनी विधानभवनाच्या पायरीवर जोरदार घोषणाबाजी करत आघाडी सरकारला सळो की पळो करून सोडलं. दिल मांगे मोर, सत्तार आहे चोर… अशा घोषणा विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवरून दिल्या.