मध्यप्रदेश: मध्यप्रदेशातील इंदुर शहरात एका लहान दीराने मित्रासोबत मिळून आपल्याच वहिनीवर बलात्कार केला. याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक देखील केली आहे.
याबद्दल अधिक माहिती अशी कि, २९ वर्षीय पीडित महिला लसूडिया पोलीस स्टेशन परिसरात राहते. या महिलेचा पती हा परराज्यात नोकरीला आहे. मंगळवारी (२७ डिसेंबर) पीडित महिला काही कामानिमित्त बाहेर गेली होती. त्यामुळे रात्री घरी येण्यास तिला उशीर झाला. हायवेवरून गावात जाण्यासाठी काही वाहन नसल्याने पीडित महिला ही वाट बघत थांबली होती. यावेळी महिलेचा दीर आणि त्याचा मित्र रिक्षातून तेथे आले. वहिनी तुम्हाला घरी सोडतो असं म्हणत त्याने महिलेला रिक्षात बसवलं.

त्यानंतर वाटेत रिक्षा थांबवत वहिनीला रस्त्यालगतच्या एका शेतात नेलं. तेथे मित्रासोबत मिळून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. व आरोपी दीर हा मित्रासोबत मिळून रात्रभर वहिनीवर बलात्कार करत राहिला. त्यानंतर जेव्हा सकाळ झाली तेव्हा वहिनीला नग्न अवस्थेत तेथेच सोडून आरोपीने पळ काढला.
दरम्यान महिलेने या घटनेची माहिती आपल्या पतीपासून लपवली. मात्र, पत्नी नैराश्यात असल्याचं बघून पतीने तिची फोनवरून विचारणा केली. तेव्हा पीडित महिलेने आपल्यावर बलात्कार झाला असल्याचं पतीला सांगितलं. त्यानंतर त्याने तातडीने पत्नीला घेऊन भावाविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. तक्रार प्राप्त होताच, पोलिसांनी आरोपी दीरासह त्याच्या मित्राला अटक केली आहे.