Latest Marathi News

BREAKING NEWS

 

आजचे राशीभविष्य, बुधवार २८ डिसेंबर २०२२; जाणून घ्या कसा असेल तुमचा आजचा दिवस!

0 852

मेष:-
तुम्ही घेतलेली मेहनत वाया जाणार नाही. कुटुंबातील सदस्यांची मदत होईल. कामात स्त्रीवर्गाची मदत मिळेल. मनातील जुनी इच्छा पूर्ण होईल. व्यवसायिकांना चांगला नफा मिळेल.

 

 

 

वृषभ:-
मित्रांची ऐनवेळी मदत मिळेल. आज कामाच्या ठिकाणी सक्रिय राहाल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी कराल.सामाजिक सेवेत हातभार लावाल. दिवस हसत-खेळत जाईल.

 

मिथुन:-
योग साधनेला अधिक प्राधान्य द्यावे. आपल्या मनाचा आवाज ओळखावा. व्यावसायिक लोकांनी प्रवासात काळजी घ्यावी. इतरांच्या वागण्याचा फार विचार करू नका. कामानिमित्त दूरचा प्रवास संभवतो.

 

कर्क:-
अनपेक्षित गोष्टी घडू शकतात. मानसिक तोल सांभाळावा. आरोग्याकडे लक्ष द्यावे. अति खोलात जाऊ नका. एकांतात वेळ घालवणे पसंत कराल.

 

सिंह:-
जोडीदाराची प्रगती खुश करणारी असेल. व्यावसायिक लोकांनी सावधपणे वागावे. लहान व्यवसायिकांना लाभदायक दिवस. कोणावरही विसंबून राहू नका. वैवाहिक सौख्य उत्तम लाभेल.

 

कन्या:-
इतरांचा सल्ला फार मनावर घेऊ नका. आज जास्त मेहनत घ्यावी लागू शकते. फसवणुकीपासून सावध राहावे. घेतलेल्या प्रयत्नांना लवकरच यश मिळेल. हित शत्रूंवर लक्ष ठेवा.

 

तूळ:-
सहकार्‍यांची मोलाची साथ लाभेल. तुमचे ज्ञान कामी येईल. सामाजिक स्तरावर अनपेक्षित लाभ मिळतील. संयम व विवेकाने वागावे. प्रेमी जीवनाला बहर येईल.

 

वृश्चिक:-
वाहन खरेदीची इच्छा प्रकट कराल. घरात अधिक वेळ घालवाल. तुमच्या मताला प्राधान्य दिले जाईल. छान मनमोकळ्या गप्पा होतील. जुने प्रयत्न फळाला येतील.

 

धनू:-
कामाचा वेग वाढेल. तुमच्यातील सहनशीलता वाढीस लागेल. जवळच्या ठिकाणाला भेट द्याल. प्रतिकूलतेतून मार्ग काढता येईल. शांततेने इतरांची मते जाणून घ्या.

 

मकर:-
व्यापार्‍यांना अपेक्षित लाभ मिळेल. गोडीने सर्वांना जिंकून घ्याल. कौटुंबिक चर्चा सकारात्मक असेल. कौटुंबिक प्रगती साधता येईल. आवडते पदार्थ बनवाल.

 

कुंभ:-
जोडीदार तुमच्यावर खुश होईल. सारासार विचार करूनच निर्णय घ्यावा. तुमचे हट्ट पुरवले जातील. इतरांच्या सल्ल्याला बळी पडू नका.दिवस मनाजोगा घालवाल.

 

मीन:-
मानसिक व्यग्रता जाणवेल. परदेशी कंपनीकडून बोलावणे येईल.उधारी वसुलीसाठी प्रयत्न कराल. विचारांना योग्य दिशा द्यावी. तज्ञ मंडळींचा सल्ला घ्यावा.

 

Leave A Reply

Your email address will not be published.