“ईडी व सीबीआयचीही कारवाई कुणाच्या सांगण्यावरून होतेय हे लक्षात येते”: ‘यांचा’ केंद्र आणि राज्य सरकारला टोला
नागपूरः आमदार अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर सीबीआयने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सीबीआयचा तो अर्ज न्यायालयाने नाकारल्यामुळे आता आमदार अनिल देशमुख आता बाहेर येणार असल्यामुळे महाविकास आघाडीतील सगळेच नेते मंडळी आनंदी असल्याचे मत आमदार सुनील राऊत यांनी व्यक्त केले आहे.
यावेळी सुनीत राऊत म्हणाले, “ईडी, सीबीआयच्या कारवाईमुळे आमदार अनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय राऊत यांना तुरुंगात राहण्याची वेळ आली आहे. ईडी आणि सीबीआयने केलेल्या कारवाईमध्ये आणि ज्या नेत्यांवर आरोप लावले गेले आहेत, ते सिद्ध झाले नाहीत. त्यामुळे आता सीबीआय आणि ईडीचे अर्जही न्यायालयाकडून फेटाळले जात आहेत. त्यावरून ही कारवाई कोणाच्या आदेशावरून केली जाते हे लक्षात येते असा टोला सुनील राऊत यांनी केंद्र आणि राज्य सरकारला लगावला आहे.
दरम्यान, या कारवाईला कोणत्याही सत्याचा आधार नव्हता. सरकारविरोधात जे लोकं बोलतील त्यांना अटक करा असेच वर्तन हे सरकार करत असल्याची टीका सुनील राऊत यांनी केली आहे.