मुंबई : विधानपरिषदेत आज देवेंद्र फडणवीस यांनी महापुरुषांच्या अवमानावरुन विरोधकांनाच धारेवर धरलं. यावेळी त्यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर देखील जोरदार टीका केली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ‘सुषमा अंधारे म्हणतात की, राम आणि कृष्ण थोतांड आहेत. सीतामातेला जो सोडून जातो आणि स्वत: शबरीसोबत बोरं खात बसतो. कुछ हुवा तो क्या हमने तुमको देखा, तुमने हमको देखा हे बोललं जातं, कृष्ण बायकांना अंघोळ करताना पाहतो. कृष्ण पुन्हा अवतरत नाही. तो कुठल्यातरी गोपिकेसोबत डेटवर गेला असावा असं तुमचं नेते म्हणतात त्यावर तुम्ही काही बोलत नाहीत. त्यावर तुम्ही मुक गिळून बसतात.’

तसेच, ‘या देशातील लोकं इतके मेरिटवाले होते की, माकडं पूल बांधत होती. अशा आमच्या रामाबद्दल बोललं जातं. तेव्हा अपमान होत नाही, असे वक्तव्य करत देवेंद्र फडणवीस यांनी सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार टीका केली.