आटपाडी : सायली वेलनेस आणि फिटनेस सेंटर उद्घाटन संपन्न
आटपाडी : येथे नव्याने सुरु करण्यात आलेल्या सायली वेलनेस आणि फिटनेस सेंटर उद्घाटन आटपाडी पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी सचिन भोसले यांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी कार्यक्रमास विस्तार अधिकारी संतोष कदम, वरिष्ठ आरोग्य सल्लागार रुपाली देठे, आरोग्य सल्लागार पूनम केंगार, मासाळवाडी सागर तळे आदी मान्यवर उपस्थित होते. आरोग्य सल्लागार नितीन केंगार यांच्या वाढदिवसानिमित्त आटपाडी येथे हे पहिले आणि एकमेव सायली वेलनेस आणि फिटनेस सेंटर सुरु करण्यात आले आहे.