आटपाडी : आटपाडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य राजू लांडगे यांचे आज दिनांक २७ रोजी सांगली येथे उपचार सुरु असताना दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुबियांवर शोककळा पसरली असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा मोठा परिवार होता. ते सन २००८ ते २०१३ साली आटपाडी ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून निवडून आले होते. आटपाडी येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. त्यांच्या तिसऱ्या दिवशी माती सावडण्याचा कार्यक्रम गुरुवार दिनांक २९ रोजी सकाळी ८.०० वा. स्मशानभूमी आटपाडी येथे होणार असल्याची माहिती यांच्या नातेवाईकांनी दिली.