आ. जयकुमार गोरे यांच्यासाठी केलेला नवस फेडला
शिखर शिंगणापूर येथील श॔भु महादेवास आमदारांना सुखरूप ठेव मी तुझ्या दर्शनास म्हसवडहून अनवाणी पायी येऊन अभिषेक करीन असा नवस केला होता.
म्हसवड : माण-खटाव चे आमदार जयकुमार गोरे यांचा नुकताच अपघात झाला होता. फलटण येथे त्यांची गाडी पुलावरून खाली गेली होती. या झालेल्या अपघातातून ते सुखरूप बरे व्हावेत म्हणून म्हसवड येथील युवक आकाश मेंढापुरे यांने शिखर शिंगणापूर येथील श॔भु महादेवास आमदारांना सुखरूप ठेव मी तुझ्या दर्शनास म्हसवडहून अनवाणी पायी येऊन अभिषेक करीन असा नवस केला होता.
त्याप्रमाणे आमदार जयकुमार गोरे हे सुखरूप आहेत हे समजल्यानंतर आकाश मेंढापुरे यांनी म्हसवडहून सोमवारी सकाळी विना चप्पल शिंगणापूर कडे रवाना झाले व सायंकाळी शंभो महादेव केलेल्या नवसास पावले म्हणून अभिषेक करून नवस फेडला. तसेच आमदार लवकरच जनसेवेत रूजू व्हावेत ही प्रार्थना केली. यावेळी सोबत अॅड. शुभम पोरे, आकाश पिसे, प्रवीण केवटे, चैतन्य बडवे, प्रमोद पवार आदि उपस्थित होते. मेंढापुरे याच्या आमदार प्रेमाचे कौतुक इंजि. सुनील पोरे, बंडू धट, बी.एम. आबदागिरे आदिनी केले.
