मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमख यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयची याचिका फेटाळली आहे.
माहितीनुसार, अनिल देशमुखांच्या जामिनाविरोधात सीबीआयने हायकोर्टात धाव घेतली होती. अनिल देशमुख यांना 12 डिसेंबरला जामीन मंजूर केला होता. त्यानंतर सीबीआयने हायकोर्टात धाव घेतल्याने दहा दिवसांची स्थगितीची विनंती केली होती. न्यायालयाने ती विनंती मान्य केली. ती मुदत संपत असताना सीबीआयने पुन्हा एकदा 27 डिसेंबरपर्यंत मुदत वाढ मिळावी अशी विनंती केली होती. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी सीबीआयची ही विनंती स्वीकारली आहे. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर करताना सीबीआयला सर्वोच्च न्यायालयात अपिल करण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी दिला होता. तो कालावधी आज 27 डिसेंबरला संपला.

दरम्यान, आज अनिल देशमुख यांना जामीन मिळण्याची शक्यता आहे.