अहमदनगर : शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद भोसले यांच्यावर त्यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे यांनी पुन्हा एकदा गंभीर आरोप केला आहे.
यावेळी भाऊसाहेब शिंदे म्हणाले, “अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा भाऊ इकबाल कासकर आणि सलीम फ्रूटवाला यांच्यासोबत आर्थिक संबंध असून त्या अनेक वेळा दुबईला जातात. त्यांची चौकशी केली तर त्यांचे पाकिस्तान कनेक्शन उघड होईल असा गंभीर आरोप भाऊसाहेब शिंदे यांनी केला.

दरम्यान, माझ्या संरक्षणाची जबाबदारी राज्य शासनाने घ्यावी. मी 30 जानेवारी रोजी नगरमध्ये पुन्हा पत्रकार परिषदेत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, इकबाल कासकर आणि सलीम फ्रूटवाला यांच्याबरोबर दिपाली सय्यद यांचे आर्थिक व्यवहार असल्याचे पुरावे देऊ, असा दावा भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे.