Latest Marathi News

नियुक्ती प्रलंबित राहिलेल्या उमेदवारांनाही एमपीएससीमार्फत नियुक्ती देणार: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस!

0 160

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून निवड झालेल्या मात्र ईडब्लूएस कोट्यातून आरक्षणाची अडचण झाल्याने नियुक्ती प्रलंबित राहिलेल्या 111 उमेदवारांना दिलासा देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.

 

माहितीनुसार, धनंजय मुंडे यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करुन मॅटमध्ये पुढील सुनावणीमध्ये उमेदवारांची बाजू सरकारने भक्कमपणे मांडावी आणि उमेदवारांच्या बाजूने निकाल मिळवून द्यावा. तसंच तातडीने या उमेदवारांना नियुक्ती द्यावी. त्यांचे प्रशिक्षण, सेवा ज्येष्ठता आणि वेतन आदींबाबत असलेले संभ्रम दूर करुन न्याय्य भूमिका घ्यावी, अशी मागणी केली होती.

Manganga

 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नावर उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी नियुक्ती प्रलंबित राहिलेल्या 111 उमेदवारांच्या नियुक्तीसाठी राज्य सरकार मॅटकडे भक्कमपणे बाजू मांडणार असून, या सर्व उमेदवारांना नियुक्ती मिळवून देणार असल्याची घोषणा केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!