नागपूर: सध्या नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनात बरेच बॉम्ब फोडणार असल्याचे संजय राऊत म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर खासदार नवनीत राणा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नवनीत राणा म्हणाल्या, “तीन वर्षानंतर नागपुरात पाहिलं अधिवेशन शिंदे आणि फडणवीस सरकार मुळे होत आहे. सकाळी उठून फुसके बॉम्ब फोडले जात आहे. पण देवेंद्र फडणवीस यांनी लवंगी बॉम्ब फोडला तरी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे जेल मध्ये जातील असं वक्तव्य अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी केलं आहे.

तसेच त्या पुढे म्हणाल्या, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना सर्व काम तोंडपाठ आहेत. पण उध्दव ठाकरे यांना एकही प्रपोजल तोंडपाठ नाही. अडीच वर्षात एकाही प्रकल्पाचं उद्घाट्न केल्याचं उद्धव ठाकरेंना आठवत नसेल. उध्दव ठाकरे आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा अधिवेशनात सहभागी झाले आहेत. त्यांनी विदर्भातील १० मोठे काम सांगितले तर माझ्या खासदारकीचा पाच वर्षाचा पगार मी संजय राऊत यांना देईल, असे आवाहन नवनीत राणांनी केलं आहे.